ब्लॉग संग्रहण

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

एक पत्र ...


बारावीची परीक्षा झाल्यानंतर एका मैत्रिणीने लिहिलेले हे पत्र .......

 प्रिय अंबिका ,
जीवन रूपी रथ  रे -रे करीत चालत असतानाच त्यात कधी इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी
 छटाची उधळण होते हयात नवल ते काय ?ढगाळ कृष्णरूपी वतावरणात धुक पसरून जात आपण
सप्तरंगी छटाची लयलुट घेउन हर्षभारित होतो पण ढगाळ कलोखरुपी निसर्ग क्वचितच
आवडेल ---- नकारात्मकाच !!!!!

सुख - दुखाच्या भोवर्यात सुखाचे क्षण क्षणभंगुरच असतात .... नाही का ?  आपण
त्याचा आनंद लुटण्यात  इतके देहभान हरपुन बसतो की सुखरुपी पोर्णिमचा
चन्द्र पटकन लोप पावतो , नी सुख : दु: खाच्या अमावसेच रडगाण आंखंड गात राहतो .
या अर्थी दुःख हे आपल्याला चिरंतर अनंत भासत . सुख - दुखाच्या चक्राला फक्त
सोख्यमय करण्याच्या गोष्टितुन प्राप्त करता येतो- - - - , परंतु एकमेव
अत्युत्तम मार्ग  - - - काल्या दगडावरची रेघ ----मैत्री  आणि सहानभुति , स्नेह
- - - एक त्रयसंगमच ........ सहानभुति व स्नेहाचा ओलावा उगम पावतो तो "
सहचयार्तुनच .....

माझ्या नी तुझ्या ऐवढच काय , अनेकांच्या मैत्रितल अप्रुप गोडबंगाल रहस्य !!!!!!
कुणीही आजतोवर जाणु शकल नाही .... हे अप्रुप सत्य आहे वा असत्य पण ते सकय्रत
किती सुन्द्र्तेने दडलेल  असत , मृगजलात कुठेही गवसत नाही .....

हाताची पाचही बोटे सारखी नसतात , तसेच अनेक व्यकतिचे स्वभावही भिन्न असतात , "
व्यक्ति तितक्या प्रकृति "  - - - - - - -  इंद्रधनुषयातिल रंगाप्रमाणे , जर का
मैत्रीचा मागमुस लागला तर अनेक स्वभावतुन मने जोडली जातात एकमननिर्मितीसाठी ,
तदवत सप्तरंगापसून एक धवल रंग उदयास येतो - - - -  " एक आशेचा किरण दाखवित  "

त्यालाच मैत्री असे म्हणतात ..  . आपली ही मैत्री अशीच कायम आणि अबाधित राहू दे
हीच इच्छा ........




तुझीच मैत्रीण