रविवार म्हणजे..........
आदल्या रात्री सुखाने झोपी जाण्याचा
सहा दिवसाची झोप भरून काढण्याचा
आळसावुनच सुरु होणा-या दिवसाचा
शांतपणे कडक चहाचा आस्वाद घेण्याचा
वर्तमानपत्रातील प्रत्येक बातमी वाचण्याचा
आठवडाभर थकलेली कामे आवारन्याचा.....
रविवार म्हणजे..........
मुलांसोबत धम्माल अन मज्जा करण्याचा
मित्र मैत्रिंणींसोबत भरभरून गप्पा मारण्याचा
सकाळचा खास नाश्ता आरामशीर करण्याचा
मुलांची सुट्टी , गोंधळ , नाही ते हट्ट करण्याचा
दुपारच्या जेवणात काही वेगळेपणा आणण्याचा
अचानक घरी आलेल्या पाहूण्यांच्या सरबराईचा..........
रविवार म्हणजे..........
मंद आवाजात गाणे लावुन पुस्तक वाचण्याचा
मुलांबरोबर संध्याकाळी बागेत जाण्याचा
हिरवळीवर हुंदडत बालपण आठवण्याचा
भेळपुरी किंवा पाणीपुरीवर ताव मारण्याचा
बदल म्हणुन रात्रीच जेवण बाहेर घेण्याचा
थकून आल्यावर उद्याची तयारी करण्याचा..........रविवार म्हणजे..........
आराम म्हणताना जास्तच थकण्याचा
स्वःताला वेळ देईन असे ठरवण्याचा
पण तो कधी कधीही न मिळण्याचा
रविवार आला म्हणता म्हणता संपण्याचा
बदला पेक्षा रोजचे रुटीन चांगले म्हणयाचा
वर म्हणायचे रविवार म्हणजे बदलाचा ...............बिका




