ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

पूर्ण अपूर्ण .....

पूर्ण ,अपूर्णतेच्या खेळात.....
नियतीने अवचित ओढले
खेळात त्या  समरस होत
मीही मग माझी ना राहिले ........

घेता दोन क्षणाची विश्रांती
स्वदर्पणी  पडताळून पाहता
देवूनी स्वसत्वची आहुती 
नव्याने मज मला भेटता 

नसे मज पर्वा अडथळ्याची
असो जरी मार्ग खडतर
असता साथ मज मैत्रीची
पार करून जाईन पैलतीर .........

बिका .......