मातृत्वाची खरी अनुभूती ...!!!
ही कथा आहे नजीकच्या वर्तमानातकाळातली .. ...एक हायटेक नगर असते. सिमेंटची ऊंच ऊंच जंगले, गुळगुळीत रस्ते, त्यावर भरधाव धावणार्या गाड्या, रसत्यांवर तुरळक दिसणारे आणि आपापल्या घरात ऑफिसांतुन बंदिस्त राहणारे लोक. अशाच एका उच्च शिक्षित आणि सधन कुटुंबातील मुलगा आयआयटीमध्ये प्रवेश करतो. अभ्यासात खूप हुशार, नेहमी पहिला नंबर ठरलेला असायचा. त्याच कॉलेज मधील हुशार, सुंदर, उच्च शिक्षित कुटुंबातील मुलीशी प्रेम जमते. दोन्ही घरांतुन कसलाही विरोध नसतो. पण कॉलेज पूर्ण करून, दोघेही व्यवस्थित स्थिर झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्णय घेतात. दोघेही चांगल्या मार्कांनी पास होतात. दोघानाही चांगला जॉब, सुपर पॅकेज, घसघशीत पगार. जीवनाची एक लढाई जिंकली दोघांनी.मनाजोगते सेटल झाल्यावर नंतर लग्न करतात.. समाजात एक सुखी जोडपे आपल्या संसाराची सुरवात करते. दुसर्या लढाईची सुरवात झालेली असते. त्यामुळे दोघेही बीझी. सतत बारा बारा तास काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. दोन वर्षांच्या नियोजनानंतर छोट्या पावलाची चाहूल लागते. दिवस ही मग भराभर उलटू लागतात. एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म होतो. सगळेच काही जणु प्री प्लॅन्ड. बाप बनकेके लाईसन्स साठी मग बाळाच्या भविष्यासाठी मोठे सेविंग्स, भरपूर विमा योजना, गुंतवणूक. समझदारीची आणखी एक चुणुक. मग या सगळ्या गरजा भागविण्यासाठी तो अधिकच बिझी होतो. तिला पण स्वतःच्या करीयरची ओढ असतेच. आणि नवर्याला हातभारही लावायचा असतो ना नवीन जबाबदार्यां पार पाडायला. मग बाळाचे काय करणार ????
ही कथा आहे नजीकच्या वर्तमानातकाळातली ..
जिथे इच्छा तिथे मार्ग असतोच ना.......
दोघेही एका नामवंत Developmental psychologist कडे जातात. त्यांचे सगळे बोलणे ऎकुन ती त्यांना सांगते नो प्रोब्लेम. माझ्याकडे नेहमी अशीच जोडपी येत असतात. त्यांची गरज बघूनच मी ही कन्सल्टन्सी चालु केली आहे. आमच्याकडुन तुम्हाला बाळाला सांभाळणाऱ्या ट्रेन्ड आणि स्मार्ट मेड देऊ. त्या तुमच्या बाळाचे सर्वकाही करतील. त्याचे टाईमटेबल आम्ही बनवलेले असते त्याप्रमाणे त्याचा आहार काय असावा, कधी झोपणार, कधी उठणार, कधी जेवण करणार, सगळे काही अॅज पर शेड्युल असेल. त्याला वेळेच्या वेळी ओषधे, लसीकरण, त्याचा मानसिक आलेख वेळोवेळी घेतला जाईल. त्याची वाढ परफेक्ट आणि छान व्हावी या साठी अगदी रिसर्च डाटा आमच्याकडे आहे. तेव्हा अजिबात काळजी करू नका. आता ते तुमचे बाळ नाही तर ती आमची केस आहे. तुम्ही फक्त फी भरा आणि निर्धास्त व्हा. मग काय एक काळजी मिटली. आणखीन एक मोठी जबाबदारी पार पडल्याचा आनंद दोघांच्या चेहर्यावर झळकतो. आणि आणखीन एक हप्ता भरण्याची धावपळ ....पुन्हा दोघेही आपापल्या करीयरच्या विश्वात बिझी. एकमेकांना भेटण्यासाठीही वेळ नाही तिथे बाळासाठी कुठुन वेळ मिळणार. बाळ एक केस बनूनच मोठे होत असते. घरात कोणत्याच गोष्टीला कमी नसते. बाळाच्या मेडला सांगितले असते कि बाळाला काहीही पाहिजे तर द्या, पण त्याला रडवू नका. एके दिवशी मेडचा फोन येतो कि बाळ पिझ्झासाठी हट्ट करत आहे. ती सांगते कि फोन करून मागवून घे. फोन करून पिझ्झा मागवला जातो. अजुन दातही न आलेले बाळ फक्त टिव्हीवर बघुन पिझ्झा मागत आहे. ते कसे खाणार याचा पण विचार शिवत नाही मनाला.

असेच काही दिवस जातात. एक दिवस परत मेडचा फोन येतो कि बाळ चंद्र मागत आहे. काय करू ? ती अचंबित होते. त्याला फोन करते. तो पण संभ्रमित होतो. लगेच स्व:तला सावरुन तो Developmental Psychologist ला फोन करतो. ती आधी गडबडते. पण काही ही न दाखवता दोन मिनिटे विचार करते. आणि आनंदाने चित्कारते..... ग्रेट...ग्रेट.. .ग्रेट... congrats ... अभिनंदन It’s the time to celeribrate. Let’s have party. Your child will became Astrologer इतक्या लहान वयात त्याला चंद्र हवा आहे. Wow. Amazing. Great. एक नवीन शोध. बघा आमच्या कंपनीचा परफॉर्मन्स. येस्स. आता हा आमचा ब्रॅंड अॅबॅसिडर असेल. ( सोफीस्टीकेटेड संभाषण ). बाळ बिचारे चंद्र चंद्र करून रडून रडून थकून झोपी गेलेले असते. इकडे आपापल्या ऑफिसात दोघेही खुप आनंदीत होतात. सगळ्या सहकार्यांबरोबर पार्ट्या करतात. ( एकत्र पार्ट्य करण्यासाठी सुद्धा वेळ नाही )......असेच काही दिवस जातात. एक दिवस अचानक तिच्या संध्याकाळच्या मिटींग्ज कॅन्सल होतात. तिला लवकर सुट्टी मिळते. मग ती रात्री लवकर घरी येते. बाळ झोपलेले असते. ती मेडला विचारते की बाळ केव्हा झोपले ? मेड म्हणते कि आम्ही त्याची झोपायची वेळ ठरवली आहे. त्याप्रमाणे तो अर्ध्या तासापूर्वी झोपला. ती कुतूहलाने विचारते की कसे झोपवलेस ? उत्तर येते टीव्हीवर सीडी पाहत पाहतच तो झोपतो आमच्या कंपनीने तयार केलेली. तिला अभिमान वाटतो आपण आपल्या बाळाला योग्य संगोपन देत असल्याचा. मग ती सोफ्यावर आरामशीर बसते. टीव्ही ऑन करते थोडा वेळ चॅनल्स बदलून कंटाळा येतो. मग आपले बाळ कोणती सीडी पाहत असेल ह्या कुतूहलापोटी ती डीव्हीडी ऑन करते. बघता बघता खुष होते. पुढे पहात राहते.... आणि अचानक पाहता पाहता स्तब्ध होते. तिला काय करावे सुचत नाही. डोळ्यातून अश्रू वाहु लागतात. कितीतरी वेळ ती तशीच बसून रहाते. बाळाला उराशी कवटाळते.पटापटा मुके घेते त्याचे. बाळही थोडेसे चाळवते झोपेत. सुखावते. ती खूप खूप रडते......रात्री बर्याच उशीरा तो घरी येतो. नेहमीप्रमाणे थकुन भागुन. पहातो तर ती जागीच. रडून रडून तिचे डोळे सुजलेले असतात. तो मनात चरकतो. काय झाले म्हणून तिला विचारतो. ती त्याला घडलेले सगळे काही सांगते आणि एक निर्णयही सांगते. तो हबकतो. तिची समजुत काढायचा प्रयत्न करतो. पण ती ऎकत नाही. मग तोच तिच्या निर्णयावर विचार करतो. त्यालाही पटते आणि तो तिला पूर्ण पाठिंबा देतो.दुसर्या दिवशी ती नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये जाते. आणि नोकरीचा राजीनामा देते. सगळ्या स्टाफला धक्का बसतो. तिचा बॉस तिला बोलवतो. समजावतो. इतक्या चांगल्या पोस्टवर तु आहेस. चांगला पगार आहे. सगळे काही आहे. मग राजीनामा का देत आहेस? तो कारण विचारतो. ती उत्तरते मी दीड वर्षापूर्वी आई बनले. पण आईपण अनुभवू शकले नाही. आता मला माझ्या बाळाची संपूर्ण आई व्हायचे आहे. I want to feel the complete motherhood. बॉसही निरुत्तर होतो. तिला शुभेच्छा देतो.... ती खुप समाधानाने आणि एक निर्धार करुन संध्याकाळी लवकर घरी येते.....
बाळाची झोपेची वेळ झालेली असते. मेड नेहमीप्रमाणे सीडी लावत असते. ती तिला थांबवते. बाळाला कडेवर घेऊन टेरीस वर जाते. आकाशातला "चंद्र दाखवत", पाठीवर ममतेने हळुवार थोपटत अंगाई गीत गाते ...... निंबोनीच्या .झाडामागे चंद्र झोपला ग बाई..... आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही.........वाहत्या डोळ्यांनी आणि भरल्या आवाजात..............
बिका .....