ब्लॉग संग्रहण

शनिवार, २५ जुलै, २०१५

दरवेळी ....


दरवेळी .....

दरवेळी निरोप घेताना तुझे माझ्या मिठीत कोसळणे
तुला सावरून तू गेल्यावर मात्र माझ रित रित होणे
दरवेळी निरोप घेताना दारात तुझे पाऊल अडखळणे
तुला पाठवून तू गेल्यावर मात्र माझ रित रित होणे
दरवेळी निरोपासोबत तुझ्या सुचनांची बरसात होणे
तुझ्या काळजीने वेड्या मनाचे माञ रित रित होणे
दरवेळी निरोप घेतांना घरट्याचे एकमेकांना बिलगणे
चिमण्या पिल्लांना हसवत माझे मात्र रित रित होणे
दरवेळी निरोप घेतानां नव्या भेटीची स्वप्ने रंगवणे
तुझ्या आठवणीत झुरताना माझे मात्र रित रित होणे
दरवेळी आता हे शेवटचे असे तुझे ठाम सांगणे
तुझ्या पुढच्या परतीपर्यंत माझे मात्र रित रित होणे
अंबिका टाकळकर

कधी कधी ...

कधी कधी अवचित ढग दाटून येतात
बघता बघता मोकाट कोसळू लागतात
भिजून जाते सारी सृष्टी चिंबचिंब अन
निग्रही मनाचे बांधही ढासळू लागतात !
तुझी वाट पहाताना तो ही सोबतीला
असायचा मला नेहमी भिजवायला
आता तू दूर गेल्यावर पण असतो
डोळ्यातील वहाते अश्रू लपवायला !
जगाला मी नेहमीच कठोर दिसायची
आतली मी फक्त त्याला कळायची
त्याच्या कुशीतच बोचऱ्या वेदनांतून
मोकळी होण्याची संधी मिळायची !
आजही आलाय नेहमीसारखा धावून
मी ही कोसळेन अशी शंका घेऊन
पण मी अगदी निश्चल उभी आहे
स्वताच्याच आधारावर पाय रोवून !
कारण
आताशी पाऊस रुळायला लागलाय
अन
त्याचा मूड मला कळायला लागलाय
अंबिका टाकळकर

मी आणि माझ वादळ ...

मि आणि माझ वादळ .....
नऊ वर्षापुर्वी इवल्या इवल्या मिठ्या चोखत, मिचमिचनारे डोळे ऊघडत , कुशीत आलेल हे वादळ, आल आणि जगण्याचे, विचारांचे , चैतन्याचे संदर्भच बदलुन गेले. जे सुख, आनंद पहिल्या बाळात मिळाला नाही तो ह्या बछडयान कितीतरीपटिने दिला. खर तर नऊ वर्षाचा कालावधी इतका सोप्पा नव्हताच , एक विशेष मुल अन् एक नार्मल मुल दोघांना एकञ तितक्याच प्रेमान, ताकदीन वाढवण कठिण होत .तशीही आपल्या आयुष्यात सोप्पी गोष्ट नाहीच आहे. पण ह्या पिल्लान माञ खुप भरभरून दिल. जिथ एका शब्दासाठी तरसत होतो तिथ ' अरे आता बस्स झाल गप्प बस ' म्हणाव लागत. 'आई हरी दादाला का ग बोलता येत नाही ? किंवा तु फक्त श्रीदादालाच जास्त प्रेम का करतेस मला नाही. " ह्या ऊत्तर नसलेल्या प्रश्नापासुन सुरवात झालेल पिल्लु श्रीसाठी माझ्या डोळ्यात पाणि पाहिल की 'आई ,नको न काळजी करू मि आहे न त्याला स्ंभाळायला, मि मोठा झाल की आरंभ पण बघेल ,माझा वाढदिवस आपण आंरभमध्येच साजरा करूया " असे निरागस वाक्य ऐकल की समाधान वाटत. थोडासा हट्टी, निग्रही, पण भावनीक अस कॉम्बिनेशन ...अगदी माझ्यासारखा .....म्हणुनच मि त्याला वादळ म्हणते, आज माझ्या ह्या वादळाचा नववा वाढदिवस ..... खुप सारेे आशिर्वाद पिल्लु!