ब्लॉग संग्रहण

शनिवार, २५ जुलै, २०१५

दरवेळी ....


दरवेळी .....

दरवेळी निरोप घेताना तुझे माझ्या मिठीत कोसळणे
तुला सावरून तू गेल्यावर मात्र माझ रित रित होणे
दरवेळी निरोप घेताना दारात तुझे पाऊल अडखळणे
तुला पाठवून तू गेल्यावर मात्र माझ रित रित होणे
दरवेळी निरोपासोबत तुझ्या सुचनांची बरसात होणे
तुझ्या काळजीने वेड्या मनाचे माञ रित रित होणे
दरवेळी निरोप घेतांना घरट्याचे एकमेकांना बिलगणे
चिमण्या पिल्लांना हसवत माझे मात्र रित रित होणे
दरवेळी निरोप घेतानां नव्या भेटीची स्वप्ने रंगवणे
तुझ्या आठवणीत झुरताना माझे मात्र रित रित होणे
दरवेळी आता हे शेवटचे असे तुझे ठाम सांगणे
तुझ्या पुढच्या परतीपर्यंत माझे मात्र रित रित होणे
अंबिका टाकळकर

कधी कधी ...

कधी कधी अवचित ढग दाटून येतात
बघता बघता मोकाट कोसळू लागतात
भिजून जाते सारी सृष्टी चिंबचिंब अन
निग्रही मनाचे बांधही ढासळू लागतात !
तुझी वाट पहाताना तो ही सोबतीला
असायचा मला नेहमी भिजवायला
आता तू दूर गेल्यावर पण असतो
डोळ्यातील वहाते अश्रू लपवायला !
जगाला मी नेहमीच कठोर दिसायची
आतली मी फक्त त्याला कळायची
त्याच्या कुशीतच बोचऱ्या वेदनांतून
मोकळी होण्याची संधी मिळायची !
आजही आलाय नेहमीसारखा धावून
मी ही कोसळेन अशी शंका घेऊन
पण मी अगदी निश्चल उभी आहे
स्वताच्याच आधारावर पाय रोवून !
कारण
आताशी पाऊस रुळायला लागलाय
अन
त्याचा मूड मला कळायला लागलाय
अंबिका टाकळकर

मी आणि माझ वादळ ...

मि आणि माझ वादळ .....
नऊ वर्षापुर्वी इवल्या इवल्या मिठ्या चोखत, मिचमिचनारे डोळे ऊघडत , कुशीत आलेल हे वादळ, आल आणि जगण्याचे, विचारांचे , चैतन्याचे संदर्भच बदलुन गेले. जे सुख, आनंद पहिल्या बाळात मिळाला नाही तो ह्या बछडयान कितीतरीपटिने दिला. खर तर नऊ वर्षाचा कालावधी इतका सोप्पा नव्हताच , एक विशेष मुल अन् एक नार्मल मुल दोघांना एकञ तितक्याच प्रेमान, ताकदीन वाढवण कठिण होत .तशीही आपल्या आयुष्यात सोप्पी गोष्ट नाहीच आहे. पण ह्या पिल्लान माञ खुप भरभरून दिल. जिथ एका शब्दासाठी तरसत होतो तिथ ' अरे आता बस्स झाल गप्प बस ' म्हणाव लागत. 'आई हरी दादाला का ग बोलता येत नाही ? किंवा तु फक्त श्रीदादालाच जास्त प्रेम का करतेस मला नाही. " ह्या ऊत्तर नसलेल्या प्रश्नापासुन सुरवात झालेल पिल्लु श्रीसाठी माझ्या डोळ्यात पाणि पाहिल की 'आई ,नको न काळजी करू मि आहे न त्याला स्ंभाळायला, मि मोठा झाल की आरंभ पण बघेल ,माझा वाढदिवस आपण आंरभमध्येच साजरा करूया " असे निरागस वाक्य ऐकल की समाधान वाटत. थोडासा हट्टी, निग्रही, पण भावनीक अस कॉम्बिनेशन ...अगदी माझ्यासारखा .....म्हणुनच मि त्याला वादळ म्हणते, आज माझ्या ह्या वादळाचा नववा वाढदिवस ..... खुप सारेे आशिर्वाद पिल्लु!

डॉक्टरस डे ... थोडस मनातल .....

 डॉक्टरस डे ... थोडस मनातल .....
दहावी ते बारावी प्रत्येक जण विचारायचा तुला काय व्हायचय, काय व्हायचय हे स्पष्ट होतच पण त्या बरोबरच काय व्हायच नव्हत ह्यात दोन गोष्टी कनर्फॉम होत्या ते म्हणजे एक डाक्टर आणि दुसर शिक्षक ....
माझ्या सोबतच्या बर्याच मैञिणिनी दहावी नंतर डि.एड. केल दोन वर्षात नौकरीला लागल्या. शिक्षक न व्हायायच कारण म्हणजे (त्या वया नुसार) शिक्षीका झाले की नवरा ,शिक्षकच मिळतो .... smile emoticon असो . पण पुढे परिस्थितीन आणि नियतीन शिक्षकी पेक्षातच आणल पण थोड वेगळ्या स्वरूपात ..
दुसरा ठाम निच्छय म्हणजे डॉक्टर न होण्याचा . ह्याची दोन कारणे होती एकतर मि लहान असल्यापासुन डॉक्टरांची प्रचंड भिती. मला क्वचीतच डॉक्टरकडे जायची वेळ यायची तेव्हां मि हात भर लांब. मला चांगल आठवते मि सात आठ वर्षाची असेन तेव्हां एकदा पायाला लागल . म्हणुन बाबा मला भोकरला डॉ. भाले ह्यांच्या कडे ( तेव्हां फॅमिली डॉक्टर हि सकंल्पनाच निराळी होती) घेऊन गेले. त्यांनी तपासल्यानंतर इंजक्शन तयार करत होते ते करतानां मि बघितल आणि बाबांनी जखडुन ठेवलेला हाताला हिसका देऊन जी धुम ठोकली ती डाययरेक्ट नारायन मामाच्या घरी आमच्या घरी आणि शेतात मामा काम करायचे. डॉक्टर हातात सुई घेऊन बघतच राहिले ....
तेव्हां पासुन फार डॉक्टरची भिती बसली ते कायमची ...
अकरावी बारावीला बायोच्या प्रक्टीकलला गांडुळ, बेडुंक, झुरळ, ह्यांची चिरफाड कराव लागत असे माझ्यासारख्या सह्द्य व्यक्तीला जिवावर जायच. ( अर्थात म्हणुन डॉक्टर सह्द्य नसताता हा तर्क कोण् लावु नये ..smile emoticon ) तर पुढे मेडिकलला गेल की अशीच चिरफाड करावी लागते हे माहिती झाल की तर ठप्पा लागला की आपल्याला डॉक्टर व्हायच नाही ....
पण माझी अन् डॉक्टर आणि शिक्षक पेक्षासी चांगलेच ञृणानुंबध जोडले गेले ते नेहमी साठी . अपघातांन पहिल बाळ स्वमग्न झाल्यावर तर अनेक डक्टरसच्या दवाखान्याच्या वार्या केल्या. मुबंई, ठाणे, पुणे, नांदेड , हैदराबाद, कोचिन , अंदमान, दिल्ली ....काहि डॉक खुप छान भेटले, काही अपवाद होते. खुप ठिकाणच्या वेगवेगळ्या आठवणि आणि किस्से आहेत. त्यातले एक कुलाबा येथिल बालरोग तज्ञ एकदम सडेतोड, फटकळ पण अचुक निदान करणारे .
बाळाला बाटलीने दुध पाजता का तुमच्या घरात वाटी चमचा नाहीये का? असे बॉम्ब टाकणारे डॉक्टर तितकेच मृदु होते.
अजुन एक आठवण म्हणजे विशाखपट्टनमला असतांना खुप विचारांअती आम्ही दुसर बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला पण मन साशंक होत. प्रिपेग्रनसी काही टेस्ट कराव्यात अस निच्छीत झाल. त्यावेळेस नेव्हल हॉस्पिटल मध्ये एक स्ञीरोग तज्ञ होते त्यानी माझ्या मनातला सगळा कल्लोळ ऐकुन घेतला, आणि इतका सुदंर सल्ला दिला ' बेटा, अॅज अ डॉक्टर मै आपको सभि टेस्ट लिखवा देता हुं, आप करलो, पर उसके बाद भी बेबी नॉर्मलही होगा इसकी गंरटी नही है, टेस्ट शारीरीक जॉंच कर सकता है पर मानसिक नही, पहिले बच्चे मै प्रॉबलेम होणे की वजह से दुसरे के लिये रिस्क 2% हो जाती है! और अॅज अ फादर बोलता हुं की जो बुरा होना था हो गया, आगे के अच्छाई के लिये ही बुरा होता है! अब इससे बुरा नही होगा, मन साफ रख और वो जो ऊपरवाला है न ऊसपे भरोसा रखो और निशंक मन से सामने जाओ ओर एक स्वस्थ बालक की प्रेगंन्सी और मातृत्व का का आंनद लो ...! "
अस म्हणुन त्यांनी डोक्यावर हाथ ठेवला. गहिवरून आल होत, विशाखापट्टनम सारख्या पर प्रांतातल्या शहरात , जिथ आपल अस कुणि नाही तिथे एक माणसाचे हे शब्द कमालिच धैर्य देऊन गेले. त्याच बळावर निधुडीच दान पदरात पडल.
अश्या खुप आठवणि आहेत, काहिनी लुबाडल तर काहिनी एकही पैसा घेतला नाही अशी टोकाचे अनुभव पण आले.
देगलुर कॉलेजच्या ग्रुप मधले दहा ते बारा जण आज वेगवेगळ्या क्षेञातील तज्ञ डॉक्टर म्हणुन कार्यरत आहेत.
रोटरी जॉईन केल्याचा एक फायदा झाला की बरेच डॉक्टरस मिञ मैञिणि झाले. आईला हर्टअॅटक आल्यानंतर कमलनयन बजाज मध्ये ऑपरेशन करायच ठरवल अन कित्येक डॉक्टर मिञांचे फोन येऊन गेले काही लागल तर कधीही कळव ... डॉ. देवधर तर ग्रेटच ...
माझ्या आयुष्यात अजुन एक डॉकच कायम एक अढळ स्थान आहे ते म्हणजे डॉ. अमिता पुरोहीत, जिला मि नेहमि बयो किंवा अम्मु म्हणते, तिच सामाजीक काम इतक वेगळ आहे की आपण विचारही करू शकत नाही. एक मैञिण ,एक आई, एक विश्वस्त ह्या सगळ्याला खरी ऊतरलेली, सगळ्यात जास्त कठिण काळात जर कुणि साथ दिली असेल तर डॉ अम्मुने. दर दोन चार दिवसाआड तब्येतीच्या चौकशीचा फोन ठरलेला.
डॉ. आनंद नाडकर्णि, डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रवि कोल्हे, डॉ. अनिता पाटील, डॉ नलिनी देसाई ... असे कितीतरी डॉक लोकांनी प्रकाश पेरून ठेवलाय आपल्यापुढे, वाट फक्त आपल्यालाच निवडायचीय ....
काल डाक्टरस डे कालची संध्याकाळ , एका प्रोग्राम मध्ये काही डॉक मिञ मैञिणिसोबत गेली, कविमनाचा एक संवेदनशिल कोपरा असलेल्या ह्या सर्व डॉक सोबतची संध्याकाळ अविस्मरणिय राहीली.
माझ्या आयुष्याला स्पर्शलेल्या त्या तमाम डॉक्टरसनां आणि त्या सगळ्या डॉक लोाकांना माझ अभिवादन जे वैद्यकीय सेवा काळ वेळेची पर्वा न करता देत आहेत ...........
अंबिका टाकळकर