ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

निरोपाच्या वेळी ...

निरोपाच्या वेळी
असे गुंतवायचे नाही हातात हात ,
फक्त स्पर्श सांभाळायचा ,
मखमली त्यात,

निरोपाच्या वेळी ,
असे मोजायचे नाही मागचे क्षण,
धुऊन पुसून साफ ठेवायचे,
झाले गेलेले व्रण!

निरोपाच्या वेळी,
अस थांबवायचं नाही एकमेकांना,
बाहेर अंथरायचं आपल्या जवळच्या,
सुगंधी फुलांना ....
            बिका

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

एक प्रवास............

एक प्रवास
तुमच्या माझ्या आठवणींचा
खुप सा-या गप्पांचा
एकमेकासोबत मारलेल्या
सुख दुखाच्या !!!!!!!!!
...
एक प्रवास ,
तुझ्या माझ्या दुराव्याचा
खुप सार्या भांडणाचा
एकमेकासोबत धरलेला
अबोल्याचा ........
 
 
बिका

रविवार, १२ जून, २०११

मातृत्वाची खरी अनुभूती ...!!!

मातृत्वाची  खरी अनुभूती ...!!!
  
ही कथा आहे नजीकच्या  वर्तमानातकाळातली  .....एक  हायटेक नगर असतेसिमेंटची ऊंच ऊंच जंगलेगुळगुळीत रस्तेत्यावर भरधाव धावणार्‍या गाड्यारसत्‍यांवर तुरळक दिसणारे आणि आपापल्या घरात ऑफिसांतुन बंदिस्त राहणारे लोकअशाच एका उच्च शिक्षित आणि सधन कुटुंबातील मुलगा आयआयटीमध्ये प्रवेश करतो. अभ्यासात खूप हुशार, नेहमी पहिला नंबर ठरलेला असायचा. त्याच कॉलेज मधील हुशारसुंदरउच्च शिक्षित कुटुंबातील मुलीशी प्रेम जमते. दोन्ही घरांतुन कसलाही विरोध नसतोपण कॉलेज पूर्ण करूनदोघेही व्यवस्थित स्थिर झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्णय घेतात. दोघेही चांगल्या मार्कांनी पास होतात. दोघानाही चांगला जॉब, सुपर पॅकेज, घसघशीत पगार. जीवनाची एक लढाई जिंकली दोघांनी.मनाजोगते सेटल झाल्यावर  नंतर लग्न करतात.समाजात एक सुखी जोडपे आपल्या संसाराची सुरवात करते. दुसर्‍या लढाईची सुरवात झालेली असते. त्यामुळे दोघेही बीझी. सतत बारा बारा तास काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. दोन वर्षांच्या नियोजनानंतर छोट्या पावलाची चाहूल लागतेदिवस ही मग भराभर उलटू लागतात. एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म होतो. सगळेच काही जणु प्री प्लॅन्ड. बाप बनकेके लाईसन्स साठी मग बाळाच्या भविष्यासाठी मोठे सेविंग्सभरपूर विमा योजना, गुंतवणूक. समझदारीची आणखी एक चुणुक. मग या सगळ्या गरजा भागविण्यासाठी तो अधिकच बिझी होतो. तिला पण स्वतःच्या करीयरची ओढ असतेचआणि नवर्‍याला हातभारही लावायचा असतो ना नवीन जबाबदार्‍यां पार पाडायला. मग बाळाचे काय करणार ????
जिथे इच्छा तिथे मार्ग असतोच ना.......
 दोघेही एका नामवंत Developmental psychologist कडे जातातत्यांचे सगळे बोलणे ऎकुन ती त्यांना सांगते नो प्रोब्लेममाझ्याकडे नेहमी अशीच जोडपी येत असतातत्यांची गरज बघूनच मी ही कन्सल्टन्सी चालु केली आहेआमच्याकडुन तुम्हाला बाळाला सांभाळणाऱ्या ट्रेन्ड आणि स्मार्ट मेड देऊत्या तुमच्या बाळाचे सर्वकाही करतीलत्याचे टाईमटेबल आम्ही बनवलेले असते त्याप्रमाणे त्याचा आहार काय असावा, कधी झोपणार, कधी उठणार, कधी जेवण करणार, सगळे काही अ‍ॅज पर शेड्युल असेल. त्याला वेळेच्या वेळी ओषधेलसीकरणत्याचा मानसिक आलेख वेळोवेळी घेतला जाईलत्याची वाढ परफेक्ट आणि छान व्हावी या साठी अगदी रिसर्च डाटा आमच्याकडे आहे. तेव्हा अजिबात काळजी करू नकाआता ते तुमचे बाळ नाही तर ती आमची केस आहेतुम्ही फक्त फी भरा आणि निर्धास्त व्हा. मग काय एक काळजी मिटली. आणखीन एक मोठी जबाबदारी पार पडल्याचा आनंद दोघांच्या चेहर्‍यावर झळकतो. आणि आणखीन एक हप्ता भरण्याची धावपळ ....
पुन्हा दोघेही आपापल्या करीयरच्या विश्वात बिझीएकमेकांना भेटण्यासाठीही वेळ नाही तिथे बाळासाठी कुठुन वेळ मिळणार. बाळ एक केस बनूनच मोठे होत असतेघरात कोणत्याच गोष्टीला कमी नसतेबाळाच्या मेडला सांगितले असते कि बाळाला काहीही पाहिजे तर द्यापण त्याला रडवू नका. एके दिवशी मेडचा फोन येतो कि बाळ पिझ्झासाठी हट्ट करत आहेती सांगते कि फोन करून मागवून घेफोन करून पिझ्झा मागवला जातोअजुन दातही न आलेले बाळ फक्त टिव्हीवर बघुन पिझ्झा मागत आहे. ते कसे खाणार याचा पण विचार शिवत नाही मनाला. 

असेच काही दिवस जातात. एक दिवस परत मेडचा फोन येतो कि बाळ चंद्र मागत आहेकाय करू ती अचंबित होते. त्याला फोन करतेतो पण संभ्रमित होतो. लगेच स्व:तला सावरुन तो Developmental Psychologist ला फोन करतोती आधी गडबडते. पण काही ही न दाखवता दोन मिनिटे विचार करतेआणि आनंदाने चित्कारते..... ग्रेट...ग्रेट...ग्रेट... congrats ... अभिनंदनIt’s the time to celeribrate. Let’s have party. Your child will became Astrologer इतक्या लहान वयात त्याला चंद्र हवा आहे. Wow. Amazing. Great. एक नवीन शोधबघा आमच्या कंपनीचा परफॉर्मन्स. येस्स. आता हा आमचा ब्रॅंड अ‍ॅबॅसिडर असेल. ( सोफीस्टीकेटेड संभाषण ). बाळ बिचारे चंद्र चंद्र करून रडून रडून थकून झोपी गेलेले असते. इकडे आपापल्या ऑफिसात दोघेही खुप आनंदीत होतातसगळ्या सहकार्‍यांबरोबर पार्ट्या करतात. ( एकत्र पार्ट्य करण्यासाठी सुद्धा वेळ नाही )......असेच काही दिवस जातातएक दिवस अचानक तिच्या संध्याकाळच्या मिटींग्ज कॅन्सल होतात. तिला लवकर सुट्टी मिळतेमग ती रात्री लवकर घरी येतेबाळ झोपलेले असतेती मेडला विचारते की बाळ केव्हा झोपले ? मेड म्हणते कि आम्ही त्याची झोपायची वेळ ठरवली आहे. त्याप्रमाणे तो अर्ध्या तासापूर्वी झोपलाती कुतूहलाने विचारते की कसे झोपवलेस ? उत्तर येते टीव्हीवर सीडी पाहत पाहतच तो झोपतो आमच्या कंपनीने तयार केलेलीतिला अभिमान वाटतो आपण आपल्या बाळाला योग्य संगोपन देत असल्याचा. मग ती सोफ्यावर आरामशीर बसतेटीव्ही ऑन करते थोडा वेळ चॅनल्स बदलून कंटाळा येतो. मग आपले बाळ कोणती सीडी पाहत असेल ह्या कुतूहलापोटी ती डीव्हीडी ऑन करते. बघता बघता खुष होते. पुढे पहात राहते.... आणि अचानक पाहता पाहता स्तब्ध होतेतिला काय करावे सुचत नाहीडोळ्यातून अश्रू वाहु लागतातकितीतरी वेळ ती तशीच बसून रहातेबाळाला उराशी कवटाळते.पटापटा मुके घेते त्याचे. बाळही थोडेसे चाळवते झोपेत. सुखावते. ती खूप खूप रडते......रात्री बर्‍याच उशीरा तो घरी येतो. नेहमीप्रमाणे थकुन भागुन. पहातो तर ती जागीचरडून रडून तिचे डोळे सुजलेले असताततो मनात चरकतो. काय झाले म्हणून तिला विचारतोती त्याला घडलेले सगळे काही सांगते आणि एक निर्णयही सांगतेतो हबकतो. तिची समजुत काढायचा प्रयत्न करतो. पण ती ऎकत नाही. मग तोच तिच्या निर्णयावर विचार करतोत्यालाही पटते आणि तो तिला पूर्ण पाठिंबा देतो.दुसर्‍या दिवशी ती नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये जातेआणि नोकरीचा राजीनामा देतेसगळ्या स्टाफला धक्का बसतो. तिचा बॉस तिला बोलवतोसमजावतोइतक्या चांगल्या पोस्टवर तु आहेसचांगला पगार आहे. सगळे काही आहे. मग राजीनामा का देत आहेसतो कारण विचारतो. ती उत्तरते मी दीड वर्षापूर्वी आई बनलेपण आईपण अनुभवू शकले नाही. आता मला माझ्या बाळाची संपूर्ण आई व्हायचे आहेI want to feel the complete motherhoodबॉसही निरुत्तर होतो. तिला शुभेच्छा देतो.... ती खुप समाधानाने आणि एक निर्धार करुन संध्याकाळी लवकर घरी येते.....

 बाळाची झोपेची वेळ झालेली असतेमेड नेहमीप्रमाणे सीडी लावत असतेती तिला थांबवते. बाळाला कडेवर घेऊन टेरीस वर  जातेआकाशातला "चंद्र दाखवत"पाठीवर ममतेने हळुवार थोपटत अंगाई गीत गाते ...... निंबोनीच्या .झाडामागे चंद्र झोपला ग बाई..... आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही.........वाहत्या डोळ्यांनी आणि भरल्या आवाजात..............

बिका .....