सुरुंग लागते कधी कधी
अन मनाचा बांध फुटतो
अश्रूंच्या धारा बरसू लागतात
मन ओलेचिंब करतात
वळीवाच्या पावसासारख्या
वादळ बनुन येतात
नको त्या आठवणी
काही खपल्या असतात
वाळलेल्या वरवरून
आत मात्र भळभळत असते जखम
मग आपणच आपली
समजुत काढ्याची
अश्रुना कितीही थोपवल
तरी ते ऐकत मात्र नाहीत
मग बेदर्द पणे मीही
कोसळते त्या भयाण दरीत
दुखाचे मुखवटे बदलतात
यातना त्याच असतात
कष्टाचे रूप पलटते
दंभ मात्र तोच
प्रयत्नांती खोटीच
उमीद बुद्धी जागवते
मनही सावरत
आणि सज्ज होत
मृगजळा मागे धावण्या
पुर्ण रजनी संपते
दोलनामय अवस्थेत
नवी प्रभा घेऊन येते
नवी आशा , अपेक्षा
पुन्हा उभ राहत
घेऊनी गरुडाचे पंख
पुन्हा चढवून
कणखरपणाचे
कवच कुंडल ..............
पण रात्रीची घालमेल ,,, ओलीचिंब उशी
सांगुन जाते ...............
बिका

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा