मी कधी एकटी नसतेच मुळी
आठवणी देतात सोबत
काही सुखद तर काही दुखद
मग तयार होतात
हदयाची बोलकी सपंदन .......................
या आठवणी म्हणजे तरी काय आसत ?
घडून गेलेल
स्वप्न ? कि असतीत्वात येउन गेलेली कल्पना ?
कि आणखी काही ? काहीही आसो .............
कधी कधी आठवणीच जगण्याची उत्कटता , उमेद , आसक्ति वाढवतात,
भयाण एकांतात आश्वासक जवळीक साधतात
विरहाच्या लाटाना परतुन लावण्याच विलषण सामर्थ्य हे आठवणीत असत .
जगण्यातला अगाध आनदं धुंडाळन्याच धारिष्ट आठवनीना होत ...
कधी कधी हया आठवनी गर्दी करालाय लागतात अगदी
कधी भंडावुन टाकतात .
मनाचा तनाचा अगदी कोपरा न कोपरा त्या व्यापून टाकतात.
आपल्या आस्तित्वने एक ना अनेक आठवणी
पोर्णिमेच्या रात्रि आकाशात ता-यानि गर्दी करावी तशी
काही आठवानिना तर अतीव हलुवारतेची, तरलेतेची नाजुक्तेची आगळी किनार लागलेली असतेच.......
अश्या आठवणी एकमेकांवर वर्चस्व गाजवू पहातात.
काही आठवणी कलानुरुपे पुसट होत जातात आणि काही सदेव अबाधित राहतात .
त्या सुखद आठवणीने स्मित ह्यासाची पखरण चेहर्यावर होत जाते आणि
कधी कधी एकांतातल्या सुखद आठवानिचे ढलायला लागतात आश्रू म्हणुनच काही आठवानिना सावरयाच नसत . मनसोक्त रडू द्याच असत .
त्यांचीच तर जपनुक दिसते. काही आठवणी आसतात शुक्राच्या ताराप्रमाने.....
तर काही प्राणपनाने जिवापाड जपना-या ठेवनितल्या वस्त्रसारखी आणि
एकांततल्या वेळी जवलिक साधयाची असते त्या आठवनिशी तसे पाहता.
माणूस कधी एकटा नसतोच मुळी ,
त्याच्या सोबतित आसतात असंख्य आठवनी आणि
आसतात ती आठवणीत तयार झालेली हदयाची बोलकी सपंदन .........................
बिका ....
बिका ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा