संसार आणि त्याही पेक्षा क्लेश
असतात संसारातील नाती गोती
प्रेमपुर्वक, आनंदानं दोघांनी
एकत्र हळुवार जपावीत
संसारातल्या पहिल्या वळणावर
खुप रोमांचक असतात क्षण
पण त्याच बरोबर पुढच्या टप्प्यावर
असतात सुख दुःखाचे नाना पण
आजपर्यंतच्या प्रत्येक सुख-दु:खात
तुझा हात सदैव माझ्या हातात
जीवनाच्या कडवट सत्यावर मात
केली फक्त तुझ्या हिंमतीवर
प्रतेक निशा नंतर असते एक नवी आशा
तुझ्याच प्रेरणेने मिळाली नविन दिशा
तुझ्या न माझ्या जीवनाला अर्थ मिळेल
इथपर्यंतच्या प्रत्येक क़ष्टाचं देव फळ देइल
आयुष्याच्या खडतर प्रवासात
कधीच सुटु नये एकमेकांचा हात
आपल्या दोघांचं प्रेम रहावं अखंड
एकमेंकांच्या विश्वासानं
तसच व्हाव नावलौकिक उदंड
माझ्या श्री व्यंकटेशाच्या कृपेने .........................
बिका

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा