मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न "Autism " म्हणजे काय ? सर्वसाधारण आपल्याकडे ह्याचा अवेरनेस नाही .
माझ्या तमाम fb च्या सर्व मित्र व मैत्रिणींना "autism " बद्दल माहिती व्हावी फक्त ह्याच हेतूने हा लेख सादर आहे .
Autism(स्व्मग्न) म्हणजे मोजक्या शब्दात सागायचं म्हणजे "स्वता:च्याच विश्वात , विचारात रमने, म्हणजे स्वमग्रतेची स्थिती.
autism मुलं नेहमी समाजापसुन , अवतीभोवतीच्या वातावरणापासून नेहमी अलिप्त रहातात. नातेवाईक , मित्र - मैत्रिणी आजुबाजुचे लोक यांच्याशी काहीही देणं घेणं
नसतं. ते नेहमी स्वतःच्याच विश्वात असतात. autism मुलांमधे प्रामुख्याने जाणवुन येणारी समस्या म्हणजे भाषा संप्रेषणाची ! देवाणघेवानाची........ .
सोप्या शब्दात समजावयाचं तर समजा आपल्याला एखाद्या अनोळखी प्रदेशात
,अनोळखी लोकात नेवून सोडल तर ....
आपण गोंधळुन जाऊ , आपल्याला ती भाषा समजणार नाही व आपली त्यांना. त्यावेळेस आपली जी condition होईल. exact तीच आणि तशीच स्थिती autistic मुलांची असते. म्हणुनच ही मुलं परिसराशी संपर्क नसल्यागत वागतात. बाहय जगाशी यांचा काहीही संबध नसतो.
आपल बोलणं त्यांना ऐकू जातं व खुपदा ते त्याप्रमाणे वागतात सुद्धा पण त्यांचे डोळे आपल्याकडे बघत नाहीत. नजरेला नजर देत नाहीत. नजर आरपार जाते.
ह्यांच्या कडून शाब्दिक प्रतिसाद फार फार क्वचित मिळतो.
खुपदा हया मुलाना मतिमंदत्वाचा शिक्का मारला जातो. पण हि मुलं मतिमंद नसतात.
हया मुलाना तात्पुरत्या स्वरुपाचे संबंध वा व्यवहार जमत नाहीत. त्यामुळेच तर ती स्वतःमध्ये मशगुल असतात.
सामान्यपणे काही लक्षणे ह्याप्रकारे असतात..
१. स्वत: मध्ये गुंग असतात.
२. एकच वर्तन सतत करत असतात.(म्हणजे हात हलवने , उड्या मारने, गोल फिरने, etc )
३. सतत रडणे वा हसणे ( किंवा क्षणात हसने व क्षणात रडणे )
४. repetative language म्हणजे एखादा शब्द ,वाक्य सतत बोलत राहणे तसेच आपण म्हंटलेले शब्द, वाक्य परत परत उच्चारणे .(आपल्या मागे मागे म्हणणे )
५. स्पेशल स्किल्स नसणे .
६. एकच एक गोष्ट सतत करत राहणे.
७.वास्तवात असलेल्या गोष्टिंची कल्पना करू शकत नाहीत पण कल्पना शक्ति जबरदस्त (अफाट ) असते .
८. अति aspernger सिंड्रोम मुल काही कलांमध्ये निपुण असतात . उदा. गाणी , चित्रकला ,puzzle , आकडेवारी , मोठ मोठी calculation तसेच वर्षानुवर्षाची कालनिर्णय तारीख /वार /महिना ) रेल्वेचं अख्ख वेळापत्रक पाठ करण्याची ताकद (अलबर्ट आइनस्टाइन )हा सुद्धा autistic असं म्हणतात.
९. हया मुलाना सेंसरी डिफेसिंव्हनेस असतो. म्हणजे वास ,चव,आवाज , स्पर्श आणि दृश्य , यांच्यापैकी कशाच्या तरी बाबतीत आवड़ी निवडी टोकाच्या असतात.
पण autism मुलांच्या बाबतीत ती निवड टोकाची असू शकते. त्याचा त्रास त्याना असहय होतो, व ही मुलं आउट ऑफ़ कण्ट्रोल होतात.
अशा वेळी सगळ्यात जास्त परीक्षा असते ते हया मुलांच्या पालकांची .
नोर्मल मुलाना सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यामधे आपण आपलं सारं सत्व पणाला लावतो. इथे तर हे काम त्यापेक्षाही महा कठिण असतं.
हया मुलांची प्रतिक्रिया चर्चोघात उमटल्यानंतर ते पालक हताश होतात , ते काहीही करू शकत नाहीत.
तर माझ्या तमाम मित्र आणि मैत्रिणिनो माझी तुम्हा सर्वाना ही विनंती आहे की आपल्या आयुष्याच्या वाटेवरती जर तुम्हाला ही god गिफ्टेड मुल व त्यांचे पालक भेटले तर त्यांच्या कड़े वेगळ्या नजरेतून किंवा अलिपत्पने न पाहता त्यांची स्थिती व भावना समजुन घ्या. त्याना किंवा पालकाना वर्तनासाठी जबाबदार धरु नये.
ही सह्रदय प्रार्थना !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
They always want empathy not a sympathy..........
अंबिका टाकळकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा