विरघळुनच जाणे जर
आपले नशीब असावे
मिठाचा खडा न बनता
साखर का न बनावे !
झिजण्यासाठीच जन्म
जर का असेल घ्यावे
कोळशापरी होऊ न काळे
चंदनापरी का न झिजावे !
निर्माल्य फुलाचे असेल
पदरी जर का लिहिलेले
मोहवावा सुगंधी कट्टा का
सजुन ईशचरणी वाहिलेले !
बिका ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा