ब्लॉग संग्रहण

गुरुवार, २ जून, २०११

विरह ...!!!



माझी तुझी मैत्री किती हा गोड  संयोग
त्यातच तुझ्याशी दुरावणार हा तर मोठा वियोग
तुझ्या माझ्या मैत्रीचा वाटल उमटुन जावा ठस्सा
पण शक्य नाही हे ,जेंव्हा राहिलाच नाही मैत्रीचा  भरवसा

मैत्रीला सुळावर  चढवताना ऐकु  येते आर्त हाक
तु मला नक्कीच  विसरशील ,
पण माझ्या ह्रदयात कायम  राहशील....

मैत्रीला जर मजबुरी मानल तर
याहून मोठा अपमान कोणता?
मैत्री मनापासुन निभवायाची असते
तीळ  तीळ तोडयाची नसते जाणता अजाणता

मैत्रीत नात असत भावनेच अण विश्वासच
आणि केवळ ह्याच बळावर ,ते दृढ़ होत जात
जेव्हा हेच नात विश्वास शुन्य व भावनाशुन्य होत...
तेव्हा खाली एक मैत्रिच निर्जीव पार्थिव उरत ....

...........................................

बिका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा