हि कविता मी माझ्या एक मित्र - आणि त्याची सोनुली साठी लिहिली होती .
खर तर ह्या कवितेला मला एडीट करावे वाटलेच नाही .. शब्द जुळवणे , यमक जुळवणे नको वाटले . जे काही लिहल ...ते सरळ येथे टाकल कदाचित काही चुका असतील किंबहुना हि कविता नाहीच आहे ह्या तर फक्त प्रत्येक बाबांच्या भावना आहेत .....
आई बाबांची वेल इवलीशी
वाढली आता भर भर
नाजुक , सुंदर ,कोमल भारी
ती तर माझी गोड गोजिरी
फुलराणी ती गोंडस परीराणी
आज झाली एका राजाची राणी
आजही आठवतो तिचे बालरूप
निरागसतेचे सोजवळ स्वरूप
अवखळ , अल्लड , चंचल
बनली आज खंबीर , स्वामिनी
तु रमलीस तुझ्या संसारत
मी मात्र तुझ्या आठवणीच्या विश्वात
सुखात अन समृद्धी च्या ऐश्वर्यात
नांदा प्रेमा आनंदाने ,सोख्याने
तुझ्या वेलीवरती नाजुक फुल फुलेल
मग पुन्हा तुझे बालपण अनुभवेल
.............एक बाबा
बिका
