ब्लॉग संग्रहण

रविवार, २९ मे, २०११

स्वमग्न मी.........!!!!!

 २ एप्रिल जागितक स्वमग्न दिन . त्यानिमित्याने माझ्या सर्व छोट्या दोस्ताना शुभेच्छा !!

स्वमग्न जरी मी असे
परी मतीमंद मी नसे

जरी एक तुमच्यातील
परी विश्व माझे वेगळे

जगतो रोज आयुष्य तेच
बदल कोणता मान्य नसे

गतीची मज आवड भारी
वायुसमे धावे मती माझी

स्पर्शाची मज आवड नाही
आवाजाची भीती वाटत राही

कल्पना विश्वात रमतो
वास्तवाशी देणे न घेणे

अंकाशी माझी मैत्री खास
सुर अन रंगात मन हरवे

मी तर मृग नाभीचा
सुगंध दुर दिगंत पसरे

श्रीहरी टाकळकर,मयुर कुलकर्णी

शब्दांकन ( बिका )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा