ब्लॉग संग्रहण

शुक्रवार, ३ जून, २०११

दुरावा...!!!


तुझ्या अन माझ्या मिलनाची 
कल्पना किती सुंदर  होती केली 

पण तुझ्यातला अन माझ्यातला 
दुरावा सतत  वाढतच गेला 

तू जितका दुर दुर जातोस 
तितका हवा हवासा वाटतोस 

माझा मनातील भावना 
तुज कधीही ना कळेना 

तू गुंग आहेस स्वतःत 
मी मात्र तुझ्याच विचारात 

कधीतरी प्रेम कळले तुला 
ह्या आशेत मी सदैव  राहील......
                                 बिका 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा