गुलाबी मोरपीस...!!!
तुझी आठवण म्हणजे
सात मखमली घड्याखालुन
स्वताहून रुजणारे गुलाबी मोरपीस
कधी माझ्या गालावर छेडणारे
तर कधी माझ्या मनामध्ये हुरहुरणारे
जणू एखादी किनार असावी आयुष्याला
जी किनाऱ्यावर असून सुद्धा
तळमळ निर्माण करणारी
तृप्त होण्याची किवा शांत शांत होण्याची ....
हीच आठवण तुझी नी माझी...!!!!
बिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा