ब्लॉग संग्रहण

मंगळवार, ७ जून, २०११

वर्तुळ...!!!


आयुष्याच्या तरल , सुन्दर , लहरी 
स्वच्छ , सुन्दर , निकोप बहरी 


जिवनाच्या वाटेवरती पाय अडखळती 
सुख दुखाच्या व्याधीनी मनही डळमळती 


अवचित कुणीतरी यावा 
भयाण शांततेचा भंग करावा 

रोजेचेच तेच तेच जगणे
न कंटाळता सतत काम करने 

जपता जपता असंख्य  नाती
अनामिक आहुर हुरहुरती 

जे दिसत ते असत अस नाहीच 
पण असलेले सुद्धा उभोगता येत नाही 
हा असा विरुद्ध भास का ?

पंखास वाटे मुक्त उडावे 
परी पाय कुठेतरी रुतून बसावे 

हा संसाराचा मोहजाल
कुणालाही ना सुटला
 
कितीतरी वाटे झाले गेले 
विसरून जावे पुढे चालावे

परी अंतरीची जखम 
अतरतच वहातच राहे

फुंकर घालण्यास नाना मार्ग शोधले 
फिरुनी मी तिथेच पोहचले 

वर्तुळ असते गोल आयुष्याचिही तिच गत 
काहीतरी मीळवण्यासाठी सतत राहते धावत 

फिरुनी तिथेच पोहचले 
जिथुनी सुरवात केले ............................ 


                                बिका.... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा