आहे मज ठाऊक की मी वेगळा तरी
मी सुध्दा तुमच्यातीलच एक ना
उणीव जरी असेल काही माझ्यात तरी
आकांक्षांचे पंख सर्वांसारखेच ना
हवे मज एक आभाळ मोकळे
पंख पूर्ण पसरण्यासाठी अन
क्षितीजावरील इंद्रधनुला हळुवार
स्पर्शण्याची ओढ मलाही आहे ना
नकोच मज कोरडी सहानभुती कुणाची
असेल जर तुमच्या मनात खरचं
तर द्या मज एक संधी अन विश्वास
गगनाला ही ठेंगणे बनवु शकतो ना!!!
मी सुध्दा तुमच्यातीलच एक ना
उणीव जरी असेल काही माझ्यात तरी
आकांक्षांचे पंख सर्वांसारखेच ना
हवे मज एक आभाळ मोकळे
पंख पूर्ण पसरण्यासाठी अन
क्षितीजावरील इंद्रधनुला हळुवार
स्पर्शण्याची ओढ मलाही आहे ना
नकोच मज कोरडी सहानभुती कुणाची
असेल जर तुमच्या मनात खरचं
तर द्या मज एक संधी अन विश्वास
गगनाला ही ठेंगणे बनवु शकतो ना!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा