पुढचं नी मागचं काय,
स्वतःलाच कळत नसतं
आपलंच असत पाऊल,
तरी मुकं होऊन बसतं
आपल आभाळ आपण
कस ठरवायचं ??.....
पुढच पाऊल टाकावे लागते
दिशा जरी झाल्या नकोश्या
पाउलवाट शोधावी लागते
चांदणे जरी असले असंख्य
चांदणे जरी असले असंख्य
आपल आभाळ आपणच
ठरवायच ................
आपलं असतं आभाळ नेहमीच,
कधी कधी ते सुद्धा दूरंच लोटतं,
अमावस्या पोर्णिमा चांदण्यालाही असते,
नशीबाचं पण काहीसं तसंच असतं,
कधी कधी ते सुद्धा दूरंच लोटतं,
अमावस्या पोर्णिमा चांदण्यालाही असते,
नशीबाचं पण काहीसं तसंच असतं,
आपल आभाळ आपणच
ठरवायच ................
जरी झाल मुक पाऊल
त्याला दिशा द्यायची तुला
नशिबाच काय ते तर नेहमीच
कधीही कुणालाही दाखवत वाकुल्या
आपण मात्र चालत राहायच
अतरत निरंतर .....
आपल आभाळ आपणच
ठरवायच ..........
बिका ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा