नाटक
आणि त्यातल्या गमती जमती हया विषयावर बोलयचे होते. मुलांसोबत खुप गप्पा मारल्या .....
आणि परत निघाले . मग माझे विचारचक्र चालु झाले .
माझ्या स्मृतिपटलावर "नाटक " हया शब्दाची एंट्री आठवते ती मी चौथीत असताना ....
सगळ्यांनी मिळून एक नाटक बसवल ....पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या दोन तीन गोष्टी एकत्र करुन छान छोटेसे नाटक बसवले होते .त्यात मी पहिल्यांदा काम केल
ते पंडितजींच्या आईचे !!!!
त्यात एक वाक्य होत " राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय " खुपदा सराव करून सुद्धा माझ्या मित्राने ऎन वेळेस "राष्ट्रपती महात्मा गांधी की जय " ची घोषणा केली ....
त्याबरोबर हास्याचा एकच कल्लोळ उठला कुणालाच समजत नव्हते की नेमके काय झाले ते ? मग आमची तोंड पाहण्यासारखी झाली होती ! ही झाली नाटकाची पहिली आठवण !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पण नंतर मागे वळुन पहिलेच नाही .
दरवर्षी शाळेच्या स्नेहसमेंलनात ....शाळेत .... खुप आठवणी , खुप मजेदार किस्से ...........
एकदा कोळी स्त्रीची भुमिका करत होते .. बाईनी साड़ी गुडघ्याच्या वरती काठावर काठ अशी अगदी टाईट नेसवुन दिलेली .
तेव्हा रंगीत तालीम वगैरे आम्हाला खेड्यातल्या मुलानांच काय पण शिक्षकांना सुद्धा माहित नव्हते .....तर कोळी साड़ी घालुन स्टेजवर जात होते डोक्यावर टोपली व त्यात पुठ्ठयाचे मासे ... " मासे घ्या मासे " असे म्हणत जाताना काय झाले कळलेच नाही व आमचा स्टेजवरती साष्टांग नमस्कार !!!!! घट्ट साड़ीमुळे व्यवस्थित चालता आले नाही ...
लहानपणापासुनच मला नाटकात काम करण्यापेक्षा लेखन , नाटक बसवणे हया गोष्टींकडे जास्त ओढ़
.....
कॉलेज मध्ये तर धमाल !!!!! वर्ग बंक करून तर कधी रात्र रात्र जागुन
aasignment पूर्ण करुन नाटकाची तालीम करणे ....तासनतास चर्चा .... आणि अखेर नाटक एकदाचे चांगले बसले की ......काही तरी अड़चण ऎनवेळी यायची ....कधी backstageमध्ये गड़बड़ तर नको तिथे नाही ते संगीत ......कधी प्रकाशयोजना मध्ये सकाळ ऐवजी संध्याकाळ .......... पण येथे एकमेकांना ऎनवेळी कसे सांभाळुन घ्यायचे हे शिकलो ................
नाटक............. त्याच्या तालमी .....सादरीकरण ....क्रिया
,,,,,प्रतिक्रिया .... अशा छोट्या मोठ्या गोष्टीनी माझे व्यक्तिमत्व विकसित होत गेले .
कुठल्याही परीस्थितीत कसे वागयाचे,,, कोणत्याही अडचणींना कसे सामोरे जायचे.... आलेली
कठीण वेळ कशी निभावुन न्यायची हे सगळे नाटकाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शिकवले .............
नेव्हीच्या NWWA संस्थेत काम
करताना गाजवलेले प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरील नाटक असो किंवा एड्स सारख्या ज्वलंत विषय असो, अनेक किस्से ,, अनेक आठवणी ....
जीवनाच्या रंगमंचावर , नियति
सारख्या महान दिग्दर्शकाने एका अत्यंत कठीण आणि आवश्यक अशा भुमिकेची जबाबदारी अंगावर टाकली ............. एक आई ....ती पण स्वमग्न मुलाची !!!!!!!!!!!!!!!!!!! आणि ती भुमिका मीच समर्थपणे पेलु शकते ही त्याची इच्छा व विश्वास ..................
आणि ती भुमिका नुसतीच पार
न पाडता प्रत्येक क्षणी जगते ते पण आनंदांने............
जीवनाच्या पुढच्या अंकात
प्रवेश केला तो एका विशेष शिक्षिकेच्या भुमिकेत ( special educator )
लहानपणापासुनची आवड किंवा अंगातला सुप्त
गुण स्वस्थ बसु देत नव्हता . मग विशेष मुलांकडून छोटी छोटी नाटूकली बसवुन घेण्यास सुरवात केली . दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी काहीतरी ( अगदी ५ मिनीटे ) पण मुलानी सादरीकरण करण्यास सुरवात केली .
विशेष मुलांसाठी काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे आपण त्यांच्यासाठी कितीतरी ठिकाणी कमी पडतोय .... उणीव त्यांच्यात नाही तर आपल्यातच आहे ....
सुरवातीस सवांद कमी आणि निवेदन जास्त अशी स्क्रिप्ट निवडली किंबहुना तयार केली .
व्हीलचेरवरच्या मुलांना जास्तीत जास्त सामिल करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा संकल्प चांगलाच उपयोगी ठरला ..
हे करताना खुप मज्जा यायची ..... तालीम
करताना मुले छान करायची . वेगवेगळ्या पध्दती वापरून संवाद पाठ करुन घेतले जायचे .... स्नेह्संमेलनासाठी तर चार चार महिने आधीपासुन प्रॅक्टिस करायची . पण मुख्य प्रयोगाच्या दिवशी स्टेजवर जाताच समोर बसलेल्या आईला बघताच आपण नाटकात आहोत हे विसरून मोठ्या आवाजात आईला हाक मारणारा मुलगा असो किंवा मदत करण्यास तयार असतानासुद्धा स्वःताच्या हाताने व्हीलचेअर घेउन प्रवेश करण्याची जिद्द असो ............... समोरचा मित्र किंवा मैत्रीण सवांद जर विसरली तर त्याचे वाक्य किंवा संवाद ,भाबडेपणाने मोठ्याने सांगणारी व अस म्हण म्हणुन सांगणारी मुलगी असो ...........व त्यावर प्रेक्षकांतुन कौतुकमिश्रित हास्याचा फवारा ............ खुप खुप आठवणी
पण हया
सर्वातून जीवनाचा खरा अर्थ कळतो ..............
विशेष शिक्षिकेची भुमिका
जगत असतानाच ..............नाट्यशाला तर्फे विशेष मुलाना नाट्य व कला यांच प्रशिक्षण कसे द्यायचे ह्यासाठी श्रीमती कंचन सोनटक्के आयोजित एक वर्क शॉपला उपस्थित राहण्याचा सुवर्णयोग आला .............
हया आठ दिवसात
तर संपूर्ण जीवन नव्याने जगण्याची अनुभुति आली !!!!!!!!!! लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा मेवा !!! ह्याची पदोपदी प्रचिती आली ....
इथल्या अनेक प्रसंगांपैकी एक गमतीदार
प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे .....................
"लहान मुल व खेळ " हा विषय आमच्या ग्रुपला दिला व
पाच मिनिटे विचार करून पाच मिनिटाचे सादरीकरण करायाचे होते ............
त्यात
आम्ही सगळे लहान मुले झालो होतो . कहानी में ट्विस्ट म्हणुन सरांनी आमच्या न कळत एका मुलाला कुत्रा बनवुन , कुत्र्याचा आवाज काढत पाठवले ... तो येतो व आमच्या एका छोट्या अंध मित्राला ( हे एक अंध विशेष शिक्षक होते ) पकडतो .....हे सगळे आम्हाला इतके अनपेक्षित होते .. त्या परिस्थीतीत मला तो खरा कुत्रा आहे व तो आमच्या माझ्या मित्राला चावतो आहे असेच वाटले .......... आणि मी खरोखरच त्याला मारायला लागले .............सगळे पोट धरधरून हसत होते ...........
असे अनेक
मजेदार प्रसंग अनुभवले..........
त्यानंतर आजही तो कुत्रा
झालेला सहकारी व मी जेव्हा जेव्हा अमोरासमोर येतो तेव्हा मनमुराद हसतो .............
आता सुध्दा माझ्या छोट्या
विशेष मुलांसोबत एका नाटक करते आहे .............बघू आणखी काय काय गम्मत जम्मत होते ते ..................
बिका ................